fbpx
Advertisements

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा

छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला ?

राज्याभिषेक दिनांक : 16 जानेवारी 1681

राजमुद्रा 

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व

ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील.

 

राज्याभिषेक पूर्वीची परिस्थिती 

शंभुराजेविरुद्ध कटकारस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी सोयराबाईं पट्टराणी तर संभाजीराजेंना युवराज म्हणुन मान दिला होता. त्यामुळे स्वराज्याचे पुढचे छत्रपती संभाजीराजेच असतील यावर शिक्कामोर्तब झालेला होताच.छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर आकस्मित मृत्यूनंतर स्वराज्याचे सिंहासन रिकामे झाले होते.त्यावेळी शंभूराजे पन्हाळा गडावर होते.याच संधीचा फायदा घेऊन काही कटकारस्थानी मंत्र्यांनी राजाराम महाराजांना सिंहासनावर बसवून राज्यकारभार हाती घेण्याचा प्रयत्न केला.पण सरसेनापती हंबीरमामांच्या स्वराज्य निष्ठेमुळे संभाजी महाराजांनी हा प्रयत्न अयशस्वी केला.

Advertisements

शंभुराजेंनी लवकरात लवकर राज्याभिषेक करून घ्यावा अशी त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा होती.पण स्वराज्याची आर्थिक व राजकीय स्थिती व राज्याभिषेक करण्यासाठी होणारा खर्च व वेळ यांचा विचार करून शंभुराजेंनी यास विरोध ही केला कारण स्वराज्याची स्थिती सुधारणे हे राज्याभिषेक पेक्षा जास्त महत्वाचे आहे हे शंभुराजेंनी जाणले होते.यातच त्यांचे छत्रपती पद दिसून येते.त्यामुळे शंभुराजेंनी मंचकरोहनचा कार्यक्रम करून स्वराज्याचा कारभार सुरू केला.याच काळात औरंगजेबने काही जुलमी कर(जिझिया) लागू केले व रयतेवर अन्याय अत्याचार करू लागला.त्यामुळे शंभुराजेंनी औरंगजेबला अद्दल घडवण्यासाठी बुऱ्हाणपूर वर छापा टाकला.त्यानंतर बुऱ्हाणपूरहुन आणलेली लूट स्वराज्याच्या कार्यासाठी वापरली.

 

राज्याभिषेक करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे – छत्रपती पद

छत्रपती शिवरायांनी छत्रपती पदाने रयतेला स्थैर्य दिले होते. रयतेच्या मनात आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये आपल्याला न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला.छत्रपती हे केवळ पद राहिले नव्हते तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्थेविरुद्ध लढून कल्याणकारी राजाचे व राज्याचे प्रतीक बनले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली पण स्वतःचा राज्याभिषेक केला नव्हता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जनतेच्या मनात निर्माण झालेली भीती तसेच स्वराज्याच्या विरोधात शत्रूच्या हालचाली ही वाढल्या होत्या.या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी व रयतेच्या मनातील निर्माण झालेली भीती दूर करून स्वराज्याची घडी नीट बसवण्यासाठी संभाजी महाराजांना राज्याभिषेक करणे महत्वाचे वाटू लागले त्यामुळे शंभु राजेंनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.

इ.स.१६८१ रौद्रनाम संवत्सरातील माघ मास, माघ शुद्ध ७ ,शके १६०२ रौद्रनाम संवत्सरे जानेवारी १४,१५,१६, सन १६८१ मध्ये संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते महाराष्ट्राचे ,मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले.छत्रपती संभाजी महाराजांनी राज्याभिषेक करून खचलेल्या रयतेला आधार दिला. छत्रपती  शिवाजी  महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहतील याची हमी दिली.

Advertisements

शंभुराजेंची राजमुद्रा शिवरायांपेक्षा वेगळी असुन तिचा आकार पिंपळाच्या पानासारखा आहे.

श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।

अर्थ :- शिव पुत्र श्री शंभो याची राजमुद्रा आकाशा प्रमाणे अमर्याद आहे व

ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्याही वर छत्र म्हणून राहील.

क्षत्रियकुलावतं सिंहासनाधीश्वर श्रीमंत
श्री छत्रपती संभाजी महाराज की जय..!!

 

लेख आवडला असेल व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फेसबुक वर फोलो करा 

like page

 

छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा

छत्रपती संभाजी महाराज

शंभुराजेंचा राज्याभिषेक

chatrapati sambhaji mahara

sambhaji maharaj

sambhaji maharaj rajyabhishek

chatrapati sambhaji maharaj rajyabhishek sohala

Advertisements

Leave a Reply

%d bloggers like this: